🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 Telegram channel photo

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

@combinementortopपब्लिक चैनल

COMBINE MENTOR टीम. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!❤️ या एकत्र लढू परीक्षेशी आणि परिस्थितीशी सुद्धा..!!🌿 App Link👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml 👉अधिक माहितीसाठी - 8308598007 I'd - @Combinementortop1

8.4k

Last views

75.3k (75,259 subscribers)
सदस्य
—
Rating
68
Total Posts
Oct 20, 2026, 3:32 PM
अपडेट किया गया
Mar 29, 2026
Created
Stats

आप हिंदी में सामग्री देख रहे हैं। अन्य भाषाओं में सामग्री देखने के लिए साइट की भाषा बदलें।

चैनल जानकारी

चैनल जानकारी
चैनल का नाम🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
यूज़रनेम@combinementortop
श्रेणीप्रतियोगी परीक्षाएं
भाषाहिन्दी
देशभारत
सदस्य75,259
चैनल प्रकारपब्लिक चैनल
बनाया गया29 मार्च 2026
आखिरी अपडेट20 अक्टू॰ 2026 • कल
स्थितिसक्रिय

रैंकिंग

ग्लोबल रैंकिंग
#104549-2999
भाषा रैंकिंग
#664-14
श्रेणी रैंकिंग
#953-27

सब्सक्राइबर वृद्धि

कुल: 75.3K30 Days growth: +1.1K1.5%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सब्सक्राइबर वृद्धि - 30 Days
DateSubscribers
21:09:202674,162
22:09:202674,162
23:09:202674,162
24:09:202674,162
25:09:202674,162
26:09:202674,162
27:09:202674,162
28:09:202674,162
29:09:202674,162
30:09:202674,162
01:10:202674,162
02:10:202674,162
03:10:202674,162
04:10:202674,162
05:10:202674,162
06:10:202674,162
07:10:202674,162
08:10:202674,162
09:10:202674,162
10:10:202674,162
11:10:202674,162
12:10:202674,162
13:10:202675,222
14:10:202675,222
15:10:202675,222
16:10:202675,222
17:10:202675,222
18:10:202675,222
19:10:202675,222
20:10:202675,259
सब्सक्राइबर वृद्धि - Weekly
DateSubscribers
Week of 23:03:202663,819
Week of 30:03:202664,192
Week of 06:04:202664,429
Week of 13:04:202665,893
Week of 20:04:202666,508
Week of 27:04:202666,508
Week of 04:05:202666,508
Week of 11:05:202667,841
Week of 18:05:202667,841
Week of 25:05:202667,841
Week of 01:06:202668,946
Week of 08:06:202668,946
Week of 15:06:202669,525
Week of 22:06:202669,503
Week of 29:06:202669,503
Week of 06:07:202669,503
Week of 13:07:202669,524
Week of 20:07:202670,713
Week of 27:07:202671,382
Week of 03:08:202671,382
Week of 10:08:202671,382
Week of 17:08:202672,696
Week of 24:08:202673,696
Week of 31:08:202674,025
Week of 07:09:202674,025
Week of 14:09:202674,162
Week of 21:09:202674,162
Week of 28:09:202674,162
Week of 05:10:202674,162
Week of 12:10:202675,222
Week of 19:10:202675,259
सब्सक्राइबर वृद्धि - Monthly
DateSubscribers
March 202663,857
April 202666,508
May 202667,841
June 202669,503
July 202670,713
August 202673,696
September 202674,162
October 202675,259
सब्सक्राइबर वृद्धि - Yearly
DateSubscribers
202675,259

टॉप 10 पोस्ट

इस चैनल की सबसे ज़्यादा देखी गई पोस्ट

By views
  1. #1संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 202663.1K
  2. #2संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 अमरावती ऑफलाईन टेस्ट सिरीज संदर्भात सू59.7K
  3. #3गट ब पूर्व 2024 ला विचारलेला प्रश्न आहे... जर तुम्ही मागच्या 5 वर्षाचे59.3K
  4. #4बॉम्बे असोसिएशन :-58.1K
  5. #5नांदेडकर पहिल्यांदाच तुमच्या भेटीला येतोय..!!🤞56.8K
  6. #6गट क पूर्व परीक्षा 2026 पुणे ऑफलाईन टेस्ट सिरीजबाबत महत्वाची सूचना 👇�56.7K
  7. #7आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक पोरासाठी Mpsc ची परीक्षा56.5K
  8. #8बेलीफ आणि लिपिक परीक्षा 2026 उत्तर - पर्याय क्र. 2 b विधान जर आपण पाहि53.9K
  9. #9मागून मिळत नसेल तर ते खेचून आणावं लागतं आणि खेचून आणलं की त्याची नोंद 53.8K
  10. #10पुणे टेस्ट सिरीज I'd कार्डबाबत सूचना 👇50.8K

नवीनतम पोस्ट

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

17 अक्टू॰ 2026, 18:37

Photo
सूचना 🌿

पुणे केंद्रावरील Test Paper क्र.06 उद्या वेळेत पार पडणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व वेळेत उपस्थित राहावे.

धन्यवाद 🙏
8,4300054
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

17 अक्टू॰ 2026, 08:37

सांगलीकर पहिल्यांदाच तुमच्या भेटीला येतोय..!!🤞 सध्याची बदलती परीक्षापद्धती आणि परिस्थितीवर चर्चा करावी लागणार आहे. येणाऱ्या परीक्षेला आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हा संवाद अतिशय महत्वाचा ठरणार आहे... भेटूयात 🙏🌿 शनिवार,17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता…
16,4000055
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

15 अक्टू॰ 2026, 11:52

Photo
सांगलीकर पहिल्यांदाच तुमच्या भेटीला येतोय..!!🤞
सध्याची बदलती परीक्षापद्धती आणि परिस्थितीवर चर्चा करावी लागणार आहे.
येणाऱ्या परीक्षेला आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हा संवाद अतिशय महत्वाचा ठरणार आहे... भेटूयात 🙏🌿

शनिवार,17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता, खरे सांस्कृतिक भवन, तानवाडे प्लॉट विश्रामबाग, सांगली येथे.

हा संदेश गावगाड्यातील पोरांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी तुमची आहे.🙏🏻

सर्वांची कळकळीने वाट पाहतोय ❤️
22,40000178
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

14 अक्टू॰ 2026, 11:14

Photo
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे खटले 🌿

या घटकावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारले आहेत.. ज्या ज्या परीक्षेला आयोगाने प्रश्न विचारले आहेत त्या परीक्षेचे नाव नोट्समध्ये नमूद केले आहे जेणेकरून कोणत्या गोष्टीवर किती भर द्यायचा हे आपल्या लक्षात येइल..

लवकरच CMO Polity Handwritten Notes सह...पाहण्यासारख्या नोट्स असतील.🤞

तूर्तास धन्यवाद 🙏🏻

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
26,00000129
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

13 अक्टू॰ 2026, 16:26

Video
गट ब मुख्य परीक्षा 2025

राज्यशास्त्र विषयाच्या 15 प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण दिले आहे. प्रिंट काढून सोबत ठेवा. येणाऱ्या पूर्व -मुख्य परीक्षेसाठी फायदेशीर असेल 🙏🏻

परीक्षेपर्यंत सांगेल तेवढं काळजीपूर्वक करत चला.. मार्क वाढलेले दिसतील 🤞

Join CMO👇
https://t.me/combinementortop
30,10000109
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

09 अक्टू॰ 2026, 22:26

Photo
ज्यांचा निकाल अशा थोडक्या मार्कने जातो अशा पोरांनी काय करायचं?? असं झालं की आम्हाला वाटतं आमचाचं अभ्यास कमी पडला आणि या खोट्या आशेने आम्ही पुन्हा जोर लावून अभ्यास करतो.अपेक्षा नसणारी कितीतरी पोरं 2025 च्या पूर्व परीक्षेत नापास झाली. काही विद्यार्थी नापास झाल्यावर अगदी डोक्याला हात लावला होता आणि हा कसा काय नापास झाला असं वाटलं होतं.

गावाकडून आम्हाला पै पै कसा येतो आमचं आम्हाला माहिती राव आणि इकडं खुशाल पैशाच्या जोरावर पद विकत घेतलं जातंय.

अगदी जवळच्या माणसानं विश्वासघात करावा आणि भौतिक सुखासाठी आपल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसावा हे असंच झाल्यासारखं वाटतंय.🙏🏻

पोरांनो फक्त धीर सोडू नका.तुम्ही खचलात तर सगळं संपून जाईल.काळोखानंतर जसा प्रकाश येतो तसंच वाईट गोष्टींनंतर काहीतरी चांगलं होईल यावर विश्वास ठेवा बस्स ❤️

@रेवण..
43,40000707
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

08 अक्टू॰ 2026, 20:53

तलाठी पदावर असणारे अजय सर ❤️

काही वाईट अधिकाऱ्यांमुळं अनेक पोरं आज रस्त्यावर आहेत पण प्रशासनात काही चांगले सेवकही आहेत ज्यांच्यामुळे प्रशासन टिकून राहिलं आहे असं वाटतं त्यातलेच CMO परिवाराचे अजय सर. ( सरांनी विनंती केल्याप्रमाणे त्यांचे पूर्ण नाव सांगत नाही )

जिथं वाईट असतं तिथं काहीतरी चांगलही
असतं हे आज पाहिल्यामुळे पुन्हा एकदा थोडासा आत्मविश्वास आल्यासारखा वाटतोय.सध्याच्या परिस्थितीत अशा चांगल्या सरकारी सेवाकांचं कौतुक करायला हवं ❤️

अजय सरांचा संदेश 👇

आदरणीय रेवण सर,

सप्रेम नमस्कार,

मी सध्या तलाठी या पदावर कार्यरत असून आपल्या CMO परिवारातील एक सदस्य आहे. मी आपल्यासोबत मार्च महिन्यापासून जोडलो गेलो असून आपली स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांबद्दल ची तळमळ याचा मी खूप मोठा फॅन आहे.

नोकरी लागल्यानंतर मी माझं ध्येयच विसरून गेलो होतो परंतु आपल्या CMO परिवारासोबत जोडलो गेल्यापासून मी माझे ध्येय परत जगत आहे आणि माझे अपूर्ण राहिलेले ध्येय पूर्ण करण्याची तयारी चालू आहे.

यावर्षीच्या दुष्काळाची परिस्थिती पाहता फुल ना फुलाची पाकळी म्हणुन एका गरीब होतकरू विद्यार्थ्यासाठी उद्या पासून चालू होणारी Mentorship Batch ची मोजकी फी भरण्याची माझी ईच्छा आहे.

तरी आपण अशा एका गरीब होतकरू विद्यार्थ्याची निवड करून त्यांना मदत कशी करावी हे कृपया सांगावे आणि मी मदत केली हे कृपया कोणासही सांगू नये ही नम्र विनंती..


आपल्याबद्दल दोन ओळी....


जिंदगी ला बनवायचं असेल एवन
तर कास धरा त्या गुरूचं
ज्यांचं नाव आहे रेवण....

🙏🙏🙏
44,00000715
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

08 अक्टू॰ 2026, 10:12

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी नव्याने 75 दिवसीय Mentorship Program येत्या 9 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे.आज प्रवेशाचा अंतिम दिवस आहे.आपला प्रवेश निश्चित करून ठेवा 🙏 अभ्यासात खंड पडू नये एवढीच अपेक्षा आहे..जिथं असाल तिथून धडपड करत राहा. कष्टाला पर्याय…

combinementorship.akamai.net.in

Group C 75 DAY'S MENTORSHIP PROGRAM

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 202675 DAY'S MENTORSHIP PROGRAM  👉 प्रोग्राम- 9 ऑक्टोबर पासून सुरु होतोय. 👉प्रवेशप्रक्रिया - सोमवार,28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 पासून. 👉विद्यार्थी क्षमता मर्यादित. 👉आवर्जून सांगतोय की,अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship…

40,3000061
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

07 अक्टू॰ 2026, 20:00

पोरं गेली 7 दिवस रस्त्यावर आहेत... दुष्काळामुळे एकीकडे बापाच्या जमिनीचे पंचनामे सुरु आहेत आणि दुसरीकडे रस्त्यावर पोराच्या भविष्याचा पंचनामा करण्यासारखी परिस्थिती उभी राहिली आहे. सगळं बघून लय वंगाळ वाटतंय. प्रामाणिक कष्ट करून किमान म्हातारपणी तरी बापाला स्वतःच्या पगाराने एक चांगला धुडूत-कपडा घ्यायचं स्वप्न देखील परिस्थिती पूर्ण होऊ देईना...आमच्या आई-बापानी फक्त कष्ट करतचं मरायचं का?? पोराच्या यशामुळे आयुष्याचे 4 दिवस देखील सुखात घालवण्याचा त्यांना अधिकार नाही का??
आम्ही काहीच फुकट मागत नाही आणि आमच्या आईबापानी आम्हाला सांगून ठेवलंय की जे मिळवशील ते कष्ट करून मिळतं पण आम्ही करत असलेल्या कष्टाचीही तुम्हाला अडचण झाली आहे.इथं सगळंच जर पैशात मोजावं लागत असेल तर सर्वसामान्य घरातील पोरांनी पैसे कुठून आणायचे??
हे सगळं बघून तुम्हाला वाईट वाटतंय, आत्मविश्वास कमी झालाय, भविष्याची चिंता वाटतेय, वय वाढल्यामुळे कुटुंबाचं प्रेशर वाढतंय याची मला कल्पना आहे. परंतु वाईट वेळ, वाईट परस्थिती कधीही कायमस्वरूपी नसते.चांगले दिवस पहायला मिळतील या माझ्या वाक्यावर विश्वास ठेवा. फुटलेल्या पेपरवर परीक्षा देण्यापेक्षा 2 महिने उशिरा का असेना पण पारदर्शकपणे परीक्षा दिलेली कधीही चांगली. काहीही असलं तरी सगळं चांगलं होईल यावर विश्वास ठेवावा लागेल. कोरोनाच्यावेळी आपण सगळे आता संपणार आहोत असंच प्रत्येकाला वाटलं होतो पण जग पुन्हा पहिल्यासारखं होईल हा विश्वास ठेवून आपण धाडसणं टिकून राहिलो आणि आज सगळं जग पाहिल्यासारखं झालं. असो खचून जाऊ नका,तुमच्याशिवाय तुमच्या आईबापाला कोणी नाही त्यामुळे संयम ठेवा, सगळं चांगलं होईल यावर विश्वास ठेवा.कष्ट करत राहा.तुम्ही स्वतःचं स्वतःला सावरलं नाही तर दुसरं कोणीही तुम्हाला सावरायला येणार नाही.🙏

आलेलं वादळ काही दिवसात निघून जाणार आहे तुम्ही फक्त कोलमडून जाऊ नका,पाय घट्ट रोवून उभे राहा..शेवटपर्यंत सोबत असेन ❤️

@रेवण..
42,50000889
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

07 अक्टू॰ 2026, 09:30

Photo
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी नव्याने 75 दिवसीय Mentorship Program येत्या 9 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे.आज प्रवेशाचा अंतिम दिवस आहे.आपला प्रवेश निश्चित करून ठेवा 🙏

अभ्यासात खंड पडू नये एवढीच अपेक्षा आहे..जिथं असाल तिथून धडपड करत राहा.

कष्टाला पर्याय नाही..!
कष्टाची तयारी असेल तर अवघे अवघे सहभागी व्हा..कमी वेळात योग्य दिशेने अभ्यास केला की पास होता येतं याची तुम्हाला नक्की जाणीव होईल.

भेटूयातं..!!

खालील लिंकवर जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्या 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/69
42,2000079
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

04 अक्टू॰ 2026, 21:47

मागून मिळत नसेल तर ते खेचून आणावं लागतं आणि खेचून आणलं की त्याची नोंद इतिहासात होते..!! 🙏🏻🤞

फक्त एकजूट महत्वाची ❤️
53,800001,317
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

03 अक्टू॰ 2026, 18:16

संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2026

4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 6 व्या टेस्ट पेपरचे नियोजन पुढीलप्रमाणे👇🏻

उद्या खालील ठिकाणी टेस्ट पेपर होईल. 👇🏻

1)अमरावती (वेळ - 11 ते 12)
2)नाशिक (वेळ - 11 ते 12)
3)कोल्हापूर (वेळ - 11 ते 12)
4)नागपूर (वेळ - 11 ते 12)
5)ईश्वरपूर (वेळ - 11 ते 12)
6)छ. संभाजीनगर (वेळ - 9.30 ते 10.30)
7)नांदेड (वेळ - 9.30 ते 10.30👉विद्यार्थी संवाद असल्याने वेळेत बदल केला आहे)

उद्या खालील ठिकाणी टेस्ट पेपर होणार नाहीत👇🏻

1)पुणे ऑफलाईन परीक्षा केंद्र.
2)ऑनलाईन टेस्ट सिरीज
3) पुणे ऑफलाईन परीक्षा केंद्र आणि ऑनलाईन टेस्ट सिरीजची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

टीप- उद्याच्या टेस्ट सिरीजचा बदल काळजीपूर्वक पाहून घ्या 🙏🏻

नोंद घ्या... मित्रांना कळवा.
63,10000138
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

03 अक्टू॰ 2026, 13:14

Photo
नांदेडकर पहिल्यांदाच तुमच्या भेटीला येतोय..!!🤞
सध्याची बदलती परीक्षापद्धती आणि परिस्थितीवर चर्चा करावी लागणार आहे.
येणाऱ्या परीक्षेला आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हा संवाद अतिशय महत्वाचा ठरणार आहे... भेटूयात 🙏🌿

उद्या रविवार,04 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजता, श्री महालक्ष्मी अभ्यासिका समोर, आनंदनगर, नांदेड येथे.

हा संदेश गावगाड्यातील पोरांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी तुमची आहे.🙏🏻

सर्वांची कळकळीने वाट पाहतोय ❤️
56,80000182
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

01 अक्टू॰ 2026, 17:54

बेलीफ आणि लिपिक परीक्षा 2026 उत्तर - पर्याय क्र. 2 b विधान जर आपण पाहिलं तर तिथं स्पष्टपणे विचारलं आहे की फिरोजशहा मेहता यांची मुंबईच्या महापौरपदी तीन वेळा निवड झाली होती. म्हणजेच हे तुम्हाला माहिती हवं असे आयोगाचे म्हणणे आहे. तुम्ही कोणतंही पुस्तक पाहिलं…
53,90000204
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

01 अक्टू॰ 2026, 14:24

Photo
बेलीफ आणि लिपिक परीक्षा 2026
उत्तर - पर्याय क्र. 2

b विधान जर आपण पाहिलं तर तिथं स्पष्टपणे विचारलं आहे की फिरोजशहा मेहता यांची मुंबईच्या महापौरपदी तीन वेळा निवड झाली होती. म्हणजेच हे तुम्हाला माहिती हवं असे आयोगाचे म्हणणे आहे. तुम्ही कोणतंही पुस्तक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांची कोणकोणत्या वर्षी मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती हे वाचायला मिळतं पण त्यांची तीन वेळा मुंबईच्या महापौर पदी निवड झाली होती असे स्पष्टपणे कुठेही वाचायला मिळतं नाही. त्यांची महापौर पदी कधी निवड झाली होती हे आपण हजार वेळा वाचलं आहे पण आयोगाने त्यांची किती वेळा निवड झाली हे विचारल्यानंतर आपला गोंधळ उडाला.

वरील प्रश्न पाहिल्यानंतर सर्वसाधारण विश्लेषण असं करता येईल की तुम्ही वाचा, थोडं थांबून त्याचे विश्लेषण करा आणि मग पुढे जा. असं आयोगाचे म्हणणे आहे. एखादा समाजसुधारक वाचल्यानंतर त्याने काय काम केलं हे आपल्याला समजतं पण थोडं थांबून विश्लेषण केल्यानंतर समजतं की त्यांनी हे का केलं?? किती वेळा केलं? कोणासाठी केलं??

त्यामुळे वाचन आणि Revision सोबतच वाचलेल्या गोष्टीचं विश्लेषण करणे तितकचं महत्वाचे ठरणार आहे.

तसेच 👇🏻

d विधान अनेकांनी वाचलं असेल तर काहींनी वाचलही नसेल. सर्वच पुस्तकात किंवा नोट्स मध्ये d विधान सापडत नाही.म्हणून मी सांगितलंय की Addition महत्वाचे आहे तसेच कोलकत्ता विद्यापीठाने पदवी दिली की मुंबई विश्वविद्यालयाने पदवी दिली हे देखील तुम्हाला खात्रीशीरपणे माहिती असणं गरजेचं आहे.

फिरोजच्या मेहता यांच्या बद्दल आपण खूप वेळा माहिती वाचली आहे आणि तरीही परीक्षेमध्ये आपलं Confusion होऊन आपला प्रश्न चुकतोय. याचाच अर्थ आपला अभ्यास सुरू आहे पण त्यामध्ये परफेक्शन कमी असल्यामुळे आपले हातातले मार्क जात आहेत.

पुन्हा एकदा हेचं सांगणं राहिलं की 👇🏻

फाफटपसारा करू नका,मोजकच करा पण चांगलं करा बस्स 🙏🏻

@रेवण..
44,90000198
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

30 सित॰ 2026, 22:39

तुकोबारायांच्या शब्दात इतकचं सांगणं राहिलं की, “ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असू द्यावे सदैव समाधान ॥” काळ कठीण आहे तरीही मनाचा तोल जाऊ देऊ नये; जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करत राहावे आणि मनात समाधान ठेवावे. पुन्हा एकदा तेच सांगेल की वाईट…
46,90000605
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 🤞🏻

तुमच्या-माझ्यासारख्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं भविष्य लिहणारा दिवस ❤️

ज्ञानानी भरलेली डोकी ज्यावेळी रस्त्यावर उतरतात त्यावेळी इतिहास रचला जातो.

सहभागी व्हायला लागणारचं 🙏🏻
43,600001,122
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

Photo
PYQ Analysis मोहीम 🤞

वेळ मिळेल तसं वाचत राहा...सध्याची परिस्थिती पाहून अडखळू नका.. चालत राहा 🙏

जॉईन CMO नोट्स 👇
https://t.me/CMOnotes1
47,40000157
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक पोरासाठी Mpsc ची परीक्षा म्हणजे आशेचा किरण असतो आणि आज आमच्या या प्रामाणिक आशेवर देखील तुम्ही लाथा बुक्क्या घातल्या..आमचं जाऊद्या ओ पण मी अधिकारी व्हावं म्हणून क्षमता नसतानाही दर महिन्याला 8-10 हजार रुपये पाठवणाऱ्या माझ्या फाटक्या कपड्यातल्या बापाचा तरी विचार तुम्ही करायला हवा होता.. तुम्ही फक्त पेपर फोडला नाहीत तर आमच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
खऱ्या माणसाची दुनिया राहिली की नाही हेचं कळत नाही?? आम्ही पाठीचा कणा मोडेपर्यंत कष्ट घ्यायचं आणि ऐनवेळी गडगंज बापाच्या पोरांनी पैसे देऊन नोकऱ्या घ्यायच्या??आजवर सगळं सहन केलं पण तुम्ही आमचं स्वप्न आणि पोटच्या भाकरीसोबत खेळणार असाल तर आम्ही सहन करणार नाही.
आयोगावरचा आमचा विश्वास आम्हाला परत करा.. गोरगरीब कुटुंबातील लेकरांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कधीही मिळणार नाही. विद्यार्थ्यांना एकचं सांगणं राहिलं की, ही परिस्थिती बदलणार आहे आणि हे दिवससुद्धा निघून जातील पण तुम्ही तुमच्या अभ्यासाशी प्रामाणिक राहा. आज जर विद्यार्थ्यांसोबत आम्ही सगळे उभे राहिलो नाहीत तर येणारी वेळ आम्हाला कधीही माफ करणार नाही.जे होईल ते सहन केलं जाईल पण या पद्धतीने पोरांच्या प्रामाणिक मेहनतीला धक्का पोहचणार असेल तर वाट्याला येईल तो संघर्ष करायला आम्ही तयार आहोत.
बाकी आम्हाला काही माहिती नाही पण पोरांचं भविष्य ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती परीक्षा प्रामाणिकपणे घ्या बस्स..!!🙏🏻

जीवात-जीव असेपर्यंत सोबत आहे❤️

@रेवण..
56,500001,070
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

गट क पूर्व परीक्षा 2026 पुणे ऑफलाईन टेस्ट सिरीजबाबत महत्वाची सूचना 👇🏻

उद्या 30 ऑगस्ट रोजी टेस्ट सिरीजचा दुसरा पेपर पार पडतोय...दुसऱ्या टेस्ट पासून पुण्यामध्ये दोन परीक्षाकेंद्र असणार आहेत ती पुढीलप्रमाणे 👇

1)S. P. कॉलेज (बायोलॉजि बिल्डिंग )
2)नु. म. वि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, साने गुरुजी रस्ता, SP कॉलेजच्या मागे, सदाशिव पेठ, पुणे.

उद्यापासून तुम्हा सर्वांना हॉल तिकीट पाहून टेस्ट सिरीजसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.तुमचे हॉल तिकीट तुमच्या Mail ला आले असून त्याची Print काढून स्वतःसोबत घेऊन या. हॉल तिकीटवर ज्या सेंटरचं नाव आहे त्याचं सेंटरवर पोहचा.दुसऱ्या सेंटरवर गेलात तर Qr स्कॅन होणार नाही.

विद्यार्थ्यांच्या सोईसाठी दोन परीक्षाकेंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत...10.30 प्रवेशाची अंतिम वेळ असेल.टेस्ट सिरीजला असणाऱ्या तुमच्या सहकाऱ्यांना ही माहिती कळवा.

टीप- उद्या सर्व परीक्षाकेंद्रावर नियमितपणे पेपर पार पडणार आहे👇

1)छत्रपती संभाजीनगर (वेळ )- 9.30 ते 10.30
2)इतर सर्व परीक्षा केंद्रवर (वेळ )-11 ते 12

सर्वांना खूप खूप शुभेच्छा... पहिल्या पेपरला झालेल्या चुका दुसऱ्या पेपरला करू नका.. लढा आणि जिंका 🤞
56,70000115
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 अमरावती ऑफलाईन टेस्ट सिरीज संदर्भात सूचना 👇🏻

अमरावतीचे परीक्षाकेंद्र असलेले सेंट थॉमस प्रशासकीय महाविद्यालयची सकाळी 11 ते 12 या वेळेची प्रवेश क्षमता पूर्ण झाल्याने अनेकांना प्रवेश घेता आला नाही त्यामुळे ' इंदिरा मेघे महाविद्यालय, इरविन चौक, सिटी ट्रॅफिक पोलीस स्टेशनच्या बाजूला, अमरावती 'हे नवीन 100 मुलांसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात येत आहे.

कोणाचा प्रवेश राहिला असेल तर खालील लिंक वर जाऊन तात्काळ प्रवेश निश्चित करून घ्या 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/65

टीप - 1) दुसऱ्या टेस्ट पासून तुम्ही ऑफलाइन परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहू शकता. पहिला टेस्ट पेपर व त्याचे विश्लेषण तुम्हाला ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

2) ऐनवेळी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरिता स्पॉट ऍडमिशन होणार नाहीत याची नोंद घ्यावी.
59,7000069
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

Photo
गट ब पूर्व 2024 ला विचारलेला प्रश्न आहे... जर तुम्ही मागच्या 5 वर्षाचे पेपर प्रिंट काढून ते फक्त न सोडवता या पद्धतीने रोज किमान 10 प्रश्नांचं विश्लेषण लिहलं तर इतरांपेक्षा 2-4 मार्क तुमचे नक्की वाढतील कारण 50-60 टक्के प्रश्न हे PYQ ला धरून तयार केले जातात.

जर विश्लेषणाची ही मोहीम तुम्ही सुरु केली तर तुमच्या अभ्यासाला आणि आत्मविश्वाला वेगळी उंची मिळाल्याशिवाय राहणार नाही.. थोडी अधिक मेहनत घेऊन ही मोहीम फत्ते करा. बाकी आपण आपल्या नोट्स चॅनेलवर विश्लेषणाची ही मोहीम सुरूच ठेवणार आहे🙏🏻🤞🏻

@रेवण..

Join CMO नोट्स 👇
https://t.me/CMOnotes1
59,30000184
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

बॉम्बे असोसिएशन :-

👉स्थापना- नाना शंकरशेठ यांनी 26 ऑगस्ट 1852 रोजी
👉सचिव - भाऊ दाजी लाड
👉महाराष्ट्रातील पहिलीचं राजकीय संघटना
👉1853 ला 3000 लोकांच्या साह्या असणारा अर्ज इंग्लंडच्या सभागृहात पाठवला.
👉 बॉम्बे असोसिएशनच्या विनंती अर्जामुळे इंडियन रिफॉर्म सोसायटीची स्थापना 13 मार्च 1853 झाली.
👉 नाना शंकर शेठ यांच्या मृत्यूनंतर वि. ना. मंडलिक व मामा परमानंद यांनी या संघटनेचे पुनर्रचना केली. सदस्य होते- भाऊ दाजी, नारायण दिनानाथजी, सोराबजी शहापूरजी, रावसाहेब मंडलिक, शांताराम नारायण, रा. गो. भांडारकर, न्या. रानडे, बाळ वागळे इ.
👉 असोसिएशनच्या अर्जामुळे फॉसेट कमिशन ऑन इंडियन फायनान्स नेमले व या कमिशन पुढे नौरोजी फर्दुनजी यांनी भारतीयांची बाजू मांडली.


PYQ ला धरून असा Factual डाटा विषयानुसार तयार असेल तर परीक्षेच्या शेवटच्या कळात एक विषय 1-2 दिवसात Revise होतो.

CMO Analysis मोहीम 🌿
58,10000293
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026

मुख्य परीक्षेमध्ये टेकनॉलॉजि (Remote Sensing, GIS | GPS, संगणक ) विषयाचे एकूण 8 प्रश्न विचारले जातात.

हा भाग अनेकांना अवघड वाटतो म्हणून आपण त्याचा अभ्यास करत नाही पण इथून पुढे मुख्य परीक्षेसाठी कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष करून चालायचं नाही.

Technology विषयात चांगले मार्क्स घेण्यासाठीची सविस्तर स्ट्रॅटेजी आज सायंकाळी 6.30 वाजता आवर्जून पहा.. Technology विषय सोपा करणारे लेक्चर 🙏

YouTube Link👇
https://youtu.be/IlYzeihQ3ec?si=gI1X0fH3H0dwibp7
Video Thumbnail
45,9000095
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

पुणे टेस्ट सिरीज I'd कार्डबाबत सूचना 👇

1)पहिल्या टेस्टला अनेकांना I'd कार्ड उपलब्ध झाले नाहीत त्या सर्वांनी 24(आज ) ते 26 ऑगस्ट या 3 दिवसात आपले I'D कार्ड CMO ऑफिस मधून घेऊन जावे.

2)I'd कार्ड घेतलेल्या आणि न घेतलेल्या सर्वांची नोद केलेली असून ज्यांचे I'D कार्ड राहिले आहे त्यांनी I'd कार्ड घेऊन टेस्ट पेपर सुरळीतपणे देण्याचा आपला मार्ग सुकर करावा.

3)पुढील टेस्टला प्रत्येकाकडे I'd कार्ड असणे अनिवार्य आहे, त्याशिवाय तुमचा प्रवेश निश्चित केला जाणार नाही.

गांभीर्याने नोंद घ्या.

ऑफिस पत्ता 👇🏻
📍Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे 30
Map👇
https://maps.app.goo.gl/SpW7oFzSVQxhB4Ni7?g_st=atm
50,8000061
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 सित॰ 2026, 04:47

Photo
पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यातील परीक्षाकेंद्र पाहून घ्या.

परीक्षेची वेळ :-
1)छत्रपती संभाजीनगर - 9.30 ते 10.30
2)इतर सर्व ठिकाणी - 11 ते 12

आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचा, सावकाश जा, गडबड करू नका... खूप खूप शुभेच्छा 💐❤️

ऑनलाईन टेस्टसाठी खालील लिंकवरून प्रवेश घ्या आणि प्रिंट काढून 11 ते 12 या वेळेत पेपर सोडवा.👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/60-prelims-online-group-c-test-series-2026
50,8000082
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

26 अग॰ 2026, 21:37

Photo
बघता बघता सरावाचा दिवस जवळ आला आहे...तुम्हाला थोडी भीती वाटत असेल, धडधड होत असेल याची मला कल्पना आहे पण सरावाच्या मोहिमेला ताकदीने सामोरे जावे लागेल. पेपर सोडवत असताना आयोगाचा पेपर सोडवतोय याची जाणीव तुम्हाला नक्की होणार आहे त्यामुळे आत्मविश्वासाने या.
रविवार 23 ऑगस्टला टेस्ट सिरीजचा पहिला पेपर पार पडतोय...आपण सर्वांनी दिलेला भरभरून प्रतिसाद प्रचंड उत्साह वाढवणारा आहे. आज प्रवेश घेण्याचा अंतिम दिवस आहे. परीक्षेच्या दिवशी तुमची गैरसोय होऊ नये याकरिता योग्य वेळी आपला प्रवेश निश्चित करून घ्या.


पुणे ऑफलाईन 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/55-prelims-offline-group-c-test-series-2026

छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/64-prelims-offline-group-c-test-series-2026

नाशिक ऑफलाईन 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/57-prelims-offline-group-c-test-series-2026

कोल्हापूर ऑफलाईन 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/56-prelims-offline-group-c-test-series-2026

नांदेड ऑफलाईन 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/58-prelims-offline-group-c-test-series-2026

अमरावती ऑफलाईन 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/59-prelims-offline-group-c-test-series-2026

ईश्वरपूर ऑफलाईन 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/62-prelims-offline-group-c-test-series-2026

ऑनलाईन संपूर्ण महाराष्ट्र 👇🏻
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/60-prelims-online-group-c-test-series-2026

हे फक्त परीक्षाकेंद्र नसेल तर सरावाच्या माध्यमातून तुम्हाला निकालापर्यंत घेऊन जाणारं पवित्र ठिकाण असणार आहे...गेले 2 वर्षात CMO ने सगळं अगदी पोटतिडकीने दिलं आणि त्यामुळे आज प्रत्येक परीक्षाकेंद्र क्षमतेच्या पलीकडे चालले आहे... आभार, आभार आणि आभार ❤️

येत्या 23 ऑगस्ट पासून 'आयोगाच्या चौकटीत' भेटूयात... अवघे-अवघे सहभागी व्हा. 🙏🏻

टीप- विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे छत्रपती संभाजीनगर परीक्षा केंद्राची वेळ 9.30 ते 10.30 असेल. इतर सर्व परीक्षा केंद्राची वेळ 11 ते 12 असेल.

@रेवण..
25,8000078
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 logo
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

26 अग॰ 2026, 21:37

Photo
गट क पूर्व परीक्षा 2026
टेस्ट सिरीज

छत्रपती संभाजीनगर परीक्षाकेंद्र उपलब्ध ❤️🤞🏻

गेले 8 दिवसापासून परीक्षाकेंद्र मिळावं म्हणून विद्यार्थ्यांनी पायाची चाळण केली आणि परीक्षाकेंद्र उपलब्ध झालं.
यावेळी पुन्हा एकदा आयोगाची चौकट तुमच्यापर्यंत पोहचत आहे.

आज प्रवेशप्रक्रिया सुरु होतेय, खालील लिंक वर जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्या 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/64-prelims-offline-group-c-test-series-2026


भेटूयात परवा 23 ऑगस्ट पासून 🙏🏻
23,8000064

दिखा रहे हैं 30 में से 68 पोस्ट

रेटिंग

लॉगिन आवश्यक है

अक्सर पूछे जाने वाले प्रश्न

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 टेलीग्राम चैनल किस बारे में है?+

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 (@combinementortop) tgdio पर प्रतियोगी परीक्षाएं श्रेणी में सूचीबद्ध एक टेलीग्राम चैनल है। इस प्रोफ़ाइल पर रैंकिंग, रेटिंग, समीक्षाएँ और हाल की पोस्ट देखकर आप टेलीग्राम पर सब्सक्राइब करने से पहले तय कर सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 75,259 सब्सक्राइबर हैं।

मैं 🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 (@combinementortop) को टेलीग्राम पर कैसे जॉइन करूँ?+

tgdio पर चैनल प्रोफ़ाइल खोलें, फिर Join / Open in Telegram बटन से @combinementortop को टेलीग्राम ऐप या वेब पर खोलकर मुफ़्त सब्सक्राइब करें।

क्या 🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 एक अच्छा प्रतियोगी परीक्षाएं चैनल है?+

tgdio पर आप जॉइन करने से पहले 🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 की रेटिंग, यूज़र रिव्यू, रैंकिंग और लेटेस्ट पोस्ट देख सकते हैं। इस समय tgdio पर इसके लगभग 75,259 सब्सक्राइबर हैं। उसी श्रेणी के अन्य प्रतियोगी परीक्षाएं चैनलों से तुलना करें।

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 के स्टैट्स और लेटेस्ट पोस्ट कहाँ देखूँ?+

tgdio पर @combinementortop चैनल पेज खोलें — सब्सक्राइबर स्टैट्स, रैंकिंग, रेटिंग और हाल की पोस्ट वहाँ मिलेंगी। ज़्यादा ग्रोथ/एक्टिविटी चार्ट के लिए प्रोफ़ाइल पर Stats लिंक इस्तेमाल करें।